आमच्या बद्दल...!

नमस्कार वाचक हो,

     प्रथमतः तुम्हा रसिक वाचकांचे 'मराठी बूक वर्ल्ड' या ब्लॉगतर्फे मनःपूर्वक स्वागत आहे. मराठी पुस्तके वाचत असतानाच एक गोष्ट प्रामुख्याने समोर आली ती म्हणजे पुस्तकं निवडावीत कशी...? 

      सामान्यतः पुस्तक वाचनाची पद्धत म्हणजे आपण जे मिळेल ते पुस्तक वाचायला घेतो, तर कधी कोणीतरी आपल्याला सुचवते की, अमूक-अमूक पुस्तक खुप छान आहे. पण प्रत्येकाच्या आवडी-निवडी भिन्न असल्यामुळे कधीकधी खुपदा असं होतं की, वाचायला सुरुवात केल्यानंतर पुस्तकात रुची राहत नाही  आणि त्याचा गंभीर परिणाम आपल्या वाचनावर होतो. 

    ह्या ब्लॉगचा मुळ उद्देश तुमच्या आवडीचे पुस्तक निवडण्यास तसेच ते पुस्तकं कुठे उपलब्ध होईल याची माहिती एका क्लिकवर आपल्याला मिळावी हा आहे. त्याचबरोबर आपल्याला नवनवीन पुस्तकांची माहिती मिळवण्यासाठी या ब्लॉगला सबस्काईब करा. दर्जेदार पुस्तकांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करु.



धन्यवाद...!
रोशन कदम

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng