प्रतिपश्चंद्र - राजमुद्रा की एक रहस्य...!

       
       
           रहस्यकथा या त्याच्या गुढतेवर आधारित असतात म्हणुन त्यामधील लेखकाने तयार केलेल्या रहस्य कोड्यांची वाच्यता केल्याने जो कोणी ते पुस्तक वाचेल त्याला आधीपासूनच त्यातील गोष्टी माहीत असल्यास त्यामुळे वाचकाचा भ्रमनिरास होऊ शकतो. म्हणुनच किमान अश्या कादंबरीचें जास्त खोल स्वरुपात माहिती उपलब्ध न करुन देणे हे महत्त्वाचे असते.  

त्याअनुषंगाने आम्ही मराठीमधील एक रहस्यमय कादंबरीविषयी आज आपल्याला थोडक्यात पण उत्कंठावर्धक माहिती सादर करणार आहोत. 'प्रतिपश्चंद्र' ही कादंबरी एप्रिल २०१९ मध्ये वाचकांच्या भेटीला आलेली होती. न्यु ईरा पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेल्या या कादंबरीचे लेखन डॉ. प्रकाश सूर्यकांत कोयाडे यांनी केले आहे. साहित्य प्रकारातले त्यांचे हे पहिलं अपत्य आहे असे म्हंटले तर वावगे ठरू नये. पुस्तकाचे मुखपृष्ठ हे निकिता वैद्य आणि आतील रेखाचित्रे दिपेश यांनी साकारली आहेत. 



        डॉ. एन. रविकुमार हा या कादंबरीचा नायक म्हणुन आपल्याला पाहायला मिळेल. एमबीबीएसचे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर सायक्याट्रीची पदवी घेऊन तो सर्वसामान्यांसारखे आपले निवांत आयुष्य जगत होता पण रोजच्या दैनंदिन जीवनात त्याच्या नकळत एक अशी घटना घटते की, त्यामुळे त्याच्या आयुष्याची गणितं काही क्षणार्धातच बदलली जातात. इत्याचं संपुर्ण आयुष्य अश्या एका धोक्याच्या वळणावर येऊन उभं राहतं तेथून तो पूर्णतः पुढे ढकलला जातो. आणि…. मग सुरु होतो एक रोमांचक असा उत्कंठावर्धक रहस्यांचा मागोवा…!


         ही कादंबरी विजयनगर साम्राज्याचा खजिन्याच्या भोवती आणि रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासन यांच्या संदर्भातील रहस्य मालिकांमध्ये गुंफली आहे आणि एवढचं नसून हम्पीची वैभवता, छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, मंत्रालय, राजभवन, मंत्रालय, बारा ज्योतिर्लिंगं, कैलास पर्वत ते अजिंठ्याच्या कैलास लेण्या यांच्या बाबतीत लेखकाने कल्पनेपलीकडले संदर्भ जोडले आहेत. डार्विनच्या सिद्धांताला भगवान विष्णुंच्या दशावताराशी साधलेला अनोखा योगायोग, चिदंबरम मंदिराचा विचारा पलिकडचा अकल्पनीय असा चराचराशी असलेला संबंध खुप विचारात पाडतो आणि इतकच नव्हे तर हा विचार शरीराच्या आणि मनाच्याही पल्याड जे अनंत (infinity) आहे तिथपर्यंत घेऊन जातो. मंदिरं ही केवळ आपली श्रध्दास्थानं नसून ती स्वतःतच एक ऊर्जास्थानं आहेत याची कित्तेक दाखले लेखक डॉ. प्रकाश कोयाडे यांनी दिले आहेत. 


          पुस्तकातील काही ठराविक पात्रं शिवचरित्रकार सूर्यकांतराव मोरे, इतिहास संशोधक प्रशीक सोनवणे, न्यायाधीश कृष्णकांत दीक्षित, IB ऑफिसर अजित माने, रविचे मित्र आदित्य आणि प्रियल, प्रोफेसर नागनाथ स्वामी, राज्यपाल रामचंद्रन इत्यादी अशी अजून काही पण मुद्द्यांची पात्रं लेखकाने उत्तम पद्धतीने रंगवली आहेत आणि असे एक रहस्य जे साडेतीनशे वर्षांपासून उजेडात येण्याची वाट पहात आहे त्याचा खराखुरा साक्षीदार जो अजुनहि असंख्य घटना उजागर होण्याच्या प्रतिक्षेत आहे तो खुद्द 'रायगड'...!




हे पुस्तक आपल्याला खाली दिलेल्या संकेतस्थळांवरुन खरेदी करता येईल.

अक्षरधारा बूकगंगा



संबंधित प्रकाशन व्हिडिओ ईथे पहा.



Previous
Next Post »

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng