वन इंडियन गर्ल - एक भारतीय स्त्री..!

    


  महिला सबलीकरण व स्त्रीत्ववाद यामध्ये सतत गृहीत धरल्या जाणार्‍या प्रवृत्तीला दिलेले आव्हान यात लेखक चेतन भगत यांनी मांडले आहे. 
पुस्तकाचे लेखन हे चित्रपटाच्या स्क्रिप्टला साजेसं आहे. मराठीतील अनुवाद डॉ. कमलेश सोमण यांनी रूपा अँड कं. या प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून प्रकाशित केले आहे. पुस्तकाची कथा ही एका पंजाबी कुटुंबातील राधिका मेहता या मुलीची आहे. 

तिच्या गव्हाळ रंगामुळे तिला तिच्या कुटुंबातून विशेषत तिच्या आईकडुन टोमणे ऐकायला मिळत असतात. पण ती अश्या किरकोळ गोष्टी मनावर घेत नाही. आईआईएम अहमदाबाद येथून उच्चशिक्षण पूर्ण करून नामांकित 'गोल्डमॅन सॅक्स' या इन्व्हेस्टमेंट बँकेत तिला पहिली नोकरी मिळाली. 
तो तिच्या ड्रीम जॉब होता. तिच्या कामाबद्दलच्या समर्पणामुळे अल्पावधीतच तिने उत्तम प्रगती केली. पण ती तिच्या दिसल्यामुळे थोडी स्वतःला असुरक्षित वाटुन घ्यायची. 


      राधिकाच्या आईला मात्र तिच्या वाढत्या वयाची चिंता लागून राहिली असल्याने ती तिच्या मागे लग्नासाठी होकार मिळविण्यासाठी प्रयत्न करत होती. काही वर्षानंतर ती आईला होकार देते. 
होकार मिळताच तिची आई तिच्यासाठी पंजाबी कुटुंबातीलच एक स्थळ तिच्या पसंतीने निवडते. ब्रिजेश गुलाटी  याच्या बरोबर तिचा विवाह ठरतो. 

ब्रिजेश सॅनफ्रान्सिस्को येथे फेसबुक कंपनी मध्ये नोकरी करत असतो. त्यांचा विवाह गोव्यातील एका नामांकित हॉटेलमध्ये आयोजित केले जातो. राधिका स्वतः सर्व जबाबदारी घेऊन काहीही कमी पडू नये याकडे लक्ष देत असते. 

लग्न समारंभाच्या धावपळीत असतानाच अचानकपणे तिचा भूतकाळ तिच्या समोर येऊन उभा राहतो. ज्या गोष्टींचा त्रास होऊन आज ती लग्नाला उभी राहिलेली असते त्या गोष्टी आज तिला आकर्षित करत असतात. विसरून गेलेल्या सर्व गोष्टींकडे पुन्हा ती आकर्षित होत असते. 


       लग्न समारंभाच्या गडबडीत असताना अचानक तिला तिच्या एक्स बॉयफ्रेंड "देबाशिश सेन"चा फोन येतो. ती त्याला टाळत असल्यामुळे देबू अचानक गोव्यामध्ये तिचे लग्न असलेल्या ठिकाणी पोहोचतो. 
राधिका साठी हा खूप मोठा धक्का होता. तिला काही सुचत नसते. नेमका काय निर्णय घ्यावा ज्याने तिच्या पुढच्या आयुष्याला नवी कलाटणी मिळणार होती. त्याला समजवण्याचा प्रयत्नात ती देबू जवळ आकर्षित होत असते.

 त्याचवेळी ती ज्या बँकेत काम करत असते तेथील तिचा बॉस ज्याच्याशी तिचे काही काळ संबंध होते तो "नील गुप्ता" हा सुद्धा तिला फोन करतो पण मेहंदीच्या हातांमुळे ती त्याला उत्तर देऊ नाही. त्याला सुद्धा तिच्याशी खुप महत्वाच्या विषयावर बोलायचे असल्यामुळे तो काही क्षणात त्या हॉटेलमध्ये पोहोचतो. 
पाहिल्या धक्क्याने न सावरलेली राधिका अजुन एका अडचणीत गुंतून गेली जाते. ती सारखी भूतकाळात जाऊन घडलेल्या घटनेचा विचार करते पण तिला एका निर्णयापर्यंत कसं पोहोचावं हे सुचत नसतं. 

तिला तिचा आतला आवाज यासाठी मदत करत असतो. तिच्या समोर आता काही पर्याय उपलब्ध असतात. ज्याने तिच्या वैयक्तिकच नाही तर तिच्या कुटुंबावर सुद्धा त्याचा चांगला वाईट परिणाम होणार होता. त्यापैकी तिला एका निर्णयावर पोहोचायचे होते. 


       लेखकाने या पुस्तकात सर्व प्रकारचा रस ओतला आहे. यात प्रणय आहे तशीच मजेदार विनोदी भाषा सुद्धा आहे. यात सर्व प्रकाराचा ड्रामा भरला आहे. राधिकाच्या आयुष्यात येणारी पात्रं तिचं संपूर्ण आयुष्य व्यापून टाकताना दिसतात. 
तीसुद्धा पूर्णतः त्यामध्ये गुंतून गेलेली दिसते. राधिकाच्या भूतकाळापासून तिच्या भविष्याबद्दलचा प्रवास यात मांडण्यात आला आहे. देबू आणि नील ही पात्रं देखील खूप छान मांडली आहेत. 

त्यामानानं ब्रिजेशच्या पात्राला न्याय मिळु शकला नाही. एकूणच राष्ट्रीय स्तरावर "बेस्टसेलर" झालेलं हे पुस्तक मराठी वाचकांसाठी आता उपलब्ध आहे. या पुस्तकाची कथा 'अन्विता वाजपेयी' यांच्या लाइफ आॅड्स अँड एन्ड्स पुस्तकातील चोरली असल्याचा दावा लेखिकेने केला होता. त्यामुळे प्रकाशित झाल्यानंतर सहा महिन्यांसाठी बंगलोर हायकोर्टाने या पुस्तकावर बंदी घातली होती.






ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng