ही कादंबरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुसर्या सूरत लुटीतील हरवलेल्या खजिन्यावर आधारित आहे. अन्य जगाला याचा थोडासुद्धा अंदाज लागु न देता साडे-तीनशे वर्षांपूर्वी विस्मृतीत गेलेल्या खजिन्याच्या शोधावर असलेल्या एका जीवघेण्या खेळाचे प्रात्यक्षिक यात पाहायला मिळेल.
इतिहासातील एक धागा पकडून काल्पनिकतेच्या जोरावर लेखक मुरलीधर खैरनार यांनी मराठी वाचकांसाठी जणु एक वेगळेच प्रतिकृती अर्पण केली आहे. त्याबद्दल त्यांना संपूर्ण गुण द्यायलाच पाहिजेत. राजहंस प्रकाशित या कादंबरीची पहिली आवृत्ती जुलै २०१५ मध्ये सादर झाली. चंद्रमोहन कुलकर्णी यांनी पुस्तकाच्या मुखपृष्ठामध्ये एक आकर्षित भाव उतरवला आहे.

ही गोष्ट आहे १६७० सालची. छत्रपती शिवाजी महाराजांनी याआधी एका वेळा सूरत लुटली होती आणि पुन्हा एकदा त्यांनी सूरत बेचिराख करण्याची तयारी सुरु केली.
बहिर्जी नाईकांच्या हेर खात्याने कोणत्याही प्रकारचा सुगावा लागु न देता सूरतेतील हर एक व्यापाऱ्याची बित्तंबातमी काढून आणली होती. पहिल्यांदा सूरत उलटल्यानंतर त्या ठिकाणच्या व्यापारांमध्ये एक दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते पण काही काळानंतर सारख्या उठणाऱ्या आवई ऐकुन सर्व व्यापारी गाफील झाले आणि याचाच फायदा महाराजांनी घेतला.
दुसर्या वेळेचे नियोजन इतके गुप्त होते की पाहिल्या लुटीपेक्षा कितीतरी अधिक खजिना या वेळी हस्तगत झाला. अक्षरशः तो वाहुन नेण्यासाठी जनावरं कमी पडू लागली.

सूरत लुटून पुन्हा स्वराज्यात माघारी फिरण्यासाठी महाराजांनी पूर्वीचा रस्ता पकडला पण त्या आधी औरंगजेबचा मुलगा मुअज्जम याला त्याच्या हेरखात्या मार्फत या गोष्टी समजल्या.
त्याने सरदार बहादूर खानला मराठ्यांना अडविण्यासाठी पाठवले. त्यामुळे महाराजांनी लुटीचे दोन भाग करण्याचे ठरवले. त्यापैकी पाच हजार घोड्यांवर लादलेला खजिना घेऊन महाराजांनी तुफान वेगाने पूर्वेस जाऊन पुन्हा खाली दक्षिणेकडे वळून स्वराज्य गाठले.
तर दुसर्या उरलेल्या खजिन्याचे नेतृत्व गोंदाजी नारो या सरदाराकडे होते. त्याने मोगलांना बगल देत दक्षिणेकडे जायचे ठरवले. दुर्दैवाने त्यांच्या सर्व वाटा अडवल्याने त्यांच्यापैकी एकही सैनिक जिवंत राहिला नाही.

गोंदाजी खूप जखमी झाल्याने त्याला जिवंत पकडून नेण्यात आले आणि कोठडीत टाकून त्याचा छळ सुरू करण्यात आला, पण तरीही गोंदाजी डगमगला नाही.
त्याच्या जखमांमुळे त्याच्या शरीरात विष उतरुन त्याचा मृत्यू झाला. आपण पकडले जाणार याची जाणीव असल्यामुळे त्याने त्या आधीच सर्व खजिना कुठेतरी डोंगररांगांमध्ये दडवून ठेवला आणि मरण्याआधी त्याने लपवून ठेवलेल्या खजिन्याचे गुप्त संकेत छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचण्याची तरतूद केली होती.
पण ते संकेत महाराजांपर्यंत कधीही पोहोचू शकले नाहीत. पुढे महाराजांचा मृत्यूनंतर शंभूराजांनी सुद्धा खुप प्रयत्न केला आणि त्यापुढे पेशवाईत तर कोणीही या खजिन्याचा विचार देखील केला नाही.
कालांतराने या खजिन्याचा शोध विस्मृतीत गेला. पण गुप्तपणे या खजिन्याचा शोध सुरू होता. साडे तीनशे वर्षांपूर्वीच्या या खजिन्याचा शोध आजही सुरू होता. याचा अर्थ त्यामागे काही विशिष्ट घटकांचा स्वार्थ लपला होता.
ज्यामुळे त्या शोधाला एक रक्तरंजित दिशा मिळाली होती. त्यामुळे यासाठी त्यांची हवा तेवढा पैसा खर्च करण्याची तयारी होती.

लेखकाने खुप विस्तृतपणे संपूर्ण कथा साकारली आहे. इतिहासातील एक रोमहर्षक घटना व आजच्या काळाशी जोडलेला तिचा संबंध यांचे सुंदर गुंफण केले आहे.
सर्व भौगोलिक गोष्टी, तसेच काही ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वे यांचा नवा पैलू यात आपल्याला पाहायला मिळेल. आदिवासी समाजाच्या रुढी-परंपरा त्यात भाया, देवखळा, गौळ यासारख्या ग्रामीण भागातील सणांची सर्व माहिती, त्याचबरोबर नाशिक शहरात असणारी काही प्रसिद्ध ठिकाणं व नाशिक जिल्ह्यातील गड-किल्ले, डोंगर-रांगा यांचा लेखाजोखा लेखकाच्या कल्पनाशक्तीचे दर्शन घडवतो.
तसे सांगण्यासारखं खूप आहे पण त्यामुळे कादंबरीचा रहस्यभेद होईल. एक अद्भुत थरार आणि अकल्पित वळणं घेत कादंबरी वाचकाला एक वेगळाच अनुभव प्राप्त करून देते.

ConversionConversion EmoticonEmoticon