आपल्या सर्वांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये भगवंताचे महत्व काय आहे हे काही वेगळे सांगायला नको. सुख-दुःख काहीही असो प्रत्येक गोष्टीत आपण भगवंताची आठवण काढतो.
त्यातल्या त्यात भगवान शिवाबद्दल असलेला भाव तर काही औरच. पुराणातील त्यांच्या बद्दलच्या अनेक कथा ऐकत आलेलो आहोत.
पण जर का तुम्हाला कोणी सांगितले की ज्यांना आपण आज भगवंताचा दर्जा दिलेला आहे. तेही एकेकाळी आपल्यासारखेच माणूस म्हणुन जन्माला आले होते तर त्यावर आपण विश्वास ठेवणार नाही.
भगवान शिवाच्या आयुष्यावरील ही वास्तवदर्शी कथा वाचली तर तुम्हाला सुद्धा अचंबित होऊन जायला होईल. खुप सार्या अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरं तर मिळतीलच पण त्याचबरोबर नवीन अनपेक्षित प्रश्नांचे समाधान होण्यास सुद्धा मदत होईल.
भगवान शिवाच्या जीवनावर आधारित तीन पुस्तकांमध्ये ही कथा सामावली आहे. इंग्रजीमधील मूळ पुस्तकांचे लेखन हे आमिष त्रिपाठी यांनी केले असुन त्यांचा मराठी अनुवाद मीना शेट्ये-संभु यांनी केला आहे.
सर्वश्रेष्ठ पौराणिक कादंबरी म्हणुन ही सर्वांच्या पसंतीस उतरली. अमेय प्रकाशन च्या माध्यमातून प्रकाशित झालेल्या या तीनही पुस्तकांची मुखपृष्ठ कमालीची सुंदर आहेत.
पाहिल्या नजरेत आकर्षित करतात. पुस्तकांचे विभाग करुन त्यांना आकर्षनीय नावं दिलेली आहेत. पाहिल्या पुस्तकाचे नाव 'मेलुहाचे मृत्युंजय' आहे तर दुसर्या भागाचे नाव 'नागांचे रहस्य' असे आहे आणि अंतिम पुस्तक 'शपथ वायुपुत्रांची'. या तिन्ही पुस्तकांची थोडक्यात माहिती घेऊया.
ख्रि. पु. १९०० काळात सिंधु संस्कृतीला त्या काळातील लोक तिला मेलुहाची भूमी म्हणत असंत. कित्येक शतकांपूर्वी या परिपूर्ण संस्कृतीचे निर्माण प्रभू रामाने केले होते.
सरस्वती नदीच्या सुकण्यामुळे या स्वाभिमानी संस्कृतीचे साम्राज्य धोक्यात आले. सूर्यवंशीं आणि चंद्रवंशी यांच्यातील वैर हे पूर्वापार चालत आले आहे. सुर्यवंशीचे साम्राज्य मोडकळीस आले.
पूर्वेकडील चंद्रवंशीयांच्या दहशतवादी हल्ल्यांपुढं त्यांचे सर्व प्रयत्न फोल ठरले. तसेच चंद्रवंशीयांप्रमाणे नागा लोकं जे शारीरिक अपंगत्व असलेली एक जमात होती.
त्यांना उत्तम युद्धकौशल्य अवगत होते त्यांचा त्रास पण होऊ लागला. सुर्यवंशी लोकांमध्ये एका प्राचीन दंतकथेवर खूप विश्वास होता.
जेव्हा जेव्हा पापींची दुष्कृत्ये वाढतात, सीमेपर्यंत पोहोचतात आणि सर्वकाही संपल्यासारखे वाटू लागतं. त्यावेळी त्या युगाचा नायक अवतार घेतो. अशी भावना मेलुहाच्या जनतेमध्ये पूर्वापार चालत आलेली होती.
मेलुहाच्या भूमीत आल्यानंतर तिथल्या सर्व गोष्टी शिवाला प्रिय वाटु लागतात. त्याचबरोबर विकर्मा असलेल्या राजकन्या सतीच्या सौंदर्याचे आकर्षण त्याला जाणवू लागते.
तिबेटहून स्थलांतरित करुन मेलुहाच्या भूमीचा रक्षणकर्ता येईल. हाच तो शिव जो स्थलांतरित करुन आलेला नियतीनं आखून दिलेल्या वाटेने कसा प्रवास करतो यावर हे पुस्तक भाष्य करतं.
कर्तव्य आणि प्रेम या दोन गोष्टी त्याला या वाटेवरून पुढे जाण्यास प्रवृत्त करतात.
पण खरंच त्याची नायक बनण्याची इच्छा होती? शिवाचा एक सामान्य मनुष्य ते आपल्या कर्तुत्वानं देवत्वाला पोहोचण्याचा प्रवास दाखवला जो खरोखर तुम्हाला कथेत रमवून ठेवतो.

ज्या पुरुषाच्या नावाने संपूर्ण भरतवर्षाला कापरे भरायचे त्याच्या विरुद्ध युद्धासाठी नीलकंठ तयार होतो.
सुरुवातीपासून गूढ असलेल्या सर्व प्रश्नांची उकल या तिसऱ्या व अंतिम पुस्तकात होते. शिवाच्या अवताराला इथे पूर्णविराम मिळतो. आजपर्यंत ऐकत आलेल्या शिवाबद्दलच्या आख्यायिकांची एक वेगळी मांडणी येथे अमिश त्रिपाठी यांनी सादर केली आहे.
आजच्या तरुण पिढीच्या दृष्टिकोनातून दिसणाऱ्या या पुस्तकांना राष्ट्रीय स्तरावर बेस्टसेलर म्हणून मान्यता मिळाली आहे.
पुरस्कार - :

सूर्यवंशींच्या दंतकथेनुसार तिबेटमधील मानसरोवरा-पाशी प्रकट झालेला शिवाला सूर्यवंशी त्याच्या निळ्या गळ्यामुळे त्यांचा नायक म्हणुन घोषित करतात. आपले साम्राज्य वाचविण्यासाठी राजा दक्ष त्याला चंद्रवंशीयां-विरुद्ध युद्धासाठी आपला नेता घोषित करतात.
त्याचबरोबर नागा लोकांमार्फत सतीवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा प्रतिशोध त्याला घ्यायचा आहे पण त्या- आधी त्यांच्या अश्या विचित्र दिसण्यामुळे आणि त्यांचा या लपूनछपून हल्ले करण्यामागचे काय कारण आहे तेही त्याला समजुन घ्यायचे आहे.
त्याचा मित्र बृहस्पती याच्या मृत्यूमुळे तर तो अधिकच उद्विग्न झाला होता. त्याला त्या विचित्र दिसणार्या नागा जमातीच्या म्होरक्याचा जीव घ्यायचा आहे. ज्यावेळी शिवा सर्व सैन्यानिशी नागा राज्यात पोहोचतो तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसतो.
पण त्यांची राणी काली ही सतीची जुळी बहीण असल्याचे समजताच या पूर्ण प्रकरणाला नाट्यमय वळण मिळतं.
तो अक्राळविक्राळ दिसणारा व्यक्ती ज्याने तिचे कित्येकदा अपहरण करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. कोण होती ती व्यक्ती त्याच्याबद्दल सतीच्या हृदयामध्ये त्यांनंतर अचानक आपलेपणाची भावना निर्माण होते?
नागांचे सूर्यवंशीयांशी असलेले वैर या दुसरी बाजू शिवाला ज्ञात होते. त्यावेळी त्याला आपल्या एकतर्फी विचारावर खूप राग येतो.
नागांचे चंद्रवंशीयांशी असलेले हितसंबंध त्याच-बरोबर चंद्रवंशी आणि सूर्यवंशी यांच्यातील असलेल्या मुळ समस्यांचे इत्यंभूत माहिती मिळते.

नागांची राजधानी असलेल्या पंचवटीमध्ये त्याला अखेरीस सैतानाचा शोध लागतो.
एका मागोमाग एक होत असलेल्या घनघोर युध्दाच्या मालिकेने संपूर्ण भरतवर्ष हादरून गेलेले असते. सततच्या होणाऱ्या अनपेक्षित घटनांमुळे त्याला नैराश्य येत असते. परंतु त्याचे असे निराश होणे युद्धाच्या दृष्टीने न परवडणारे असते.
कोणत्याही परिस्तितीत त्याला हे युद्ध जिंकावेच लागेल. त्यासाठी तो वायूपुत्रांची मदत घेण्याचे ठरवतो.
त्याला वायुपुत्रांचे साहाय्य मिळते का..? त्यांच्या नगरीमध्ये गेल्यावर त्याला स्वअस्तित्वाबद्दलच्या कोणत्या गोष्टींचा उलगडा होतो..? तो पुढे युद्धात खरंच विजयी होतो का..? की त्याला या युद्धाची भयंकर किंमत मोजावी लागते. संपूर्ण भरतवर्षाला त्याची कोणती किंमत मोजावी लागते..?
सुरुवातीपासून गूढ असलेल्या सर्व प्रश्नांची उकल या तिसऱ्या व अंतिम पुस्तकात होते. शिवाच्या अवताराला इथे पूर्णविराम मिळतो. आजपर्यंत ऐकत आलेल्या शिवाबद्दलच्या आख्यायिकांची एक वेगळी मांडणी येथे अमिश त्रिपाठी यांनी सादर केली आहे.
आजच्या तरुण पिढीच्या दृष्टिकोनातून दिसणाऱ्या या पुस्तकांना राष्ट्रीय स्तरावर बेस्टसेलर म्हणून मान्यता मिळाली आहे.
पुरस्कार - :
- चाणक्य पुरस्कार कम्युनिकेटर ऑफ द इयर.
ConversionConversion EmoticonEmoticon