द सेव्हन्थ स्क्रोल - 'कावेबाज ताईता'चे एक गूढ हस्तलिखित...!

        
            इजिप्शियन पार्श्वभूमीवर आधारित असलेल्या सहा कादंबर्‍यांमधील 'रिव्हर गॉड' या कादंबरीनंतर प्रकाशित झालेले दुसरे पुस्तक 'द सेव्हन्थ स्क्रोल' हे लेखक 'विल्बर स्मिथ' यांनी १९९५ साली लिहिले. त्याचा मराठी अनुवाद 'मेहता पब्लिशिंग हाऊसच्या' माध्यमातून 'बाळ भागवत' यांनी केला आहे. सप्टेंबर २०१५ मध्ये या कादंबरीची मराठीतील प्रथम आवृत्ती मराठी वाचकांना उपलब्ध झाली. लेखक विल्बर स्मिथ यांच्या लेखनाचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांनी त्यांच्या लिखाणासाठी जगभर प्रवास करुन संशोधन केले आहे.


हिकॉक्सच्या घोडस्वार टोळ्यांनी इजिप्शियनांचा पराभव करुन त्यांना हाकलून दिले. त्याआधी कधी इजिप्शियन लोकांना घोडा हा प्राणी माहिती नव्हता. ते सर्व राणी लॉस्ट्रिससोबत दक्षिणेकडे गेले. या युद्धात राणी लॉस्ट्रिसचा पती फेरो मॅमोस मृत्युमुखी पडल्याने फेरो मॅमोसच्या ममीचे इथिओपियाच्या पर्वतरांगेत दफन करण्यात आले होते. पुढे बर्‍याच काळानंतर राणीने आपल्या सैन्याची शिस्तबद्ध रचना करून घोडदलाचा उत्तम वापर करुन हिकॉक्सच्या टोळ्यांचा पराभव करुन अप्पर व लोअर ईजिप्तचा दुहेरी मुकुट जिंकून आपली सत्ता पुन्हा मिळविली. 

           धूसर बनून विस्मृतीत गेलेल्या कालखंडामधील अफाट खजिन्याचे स्थान निश्चित करण्यासारख्या खाणाखुणा चार हजार वर्षांपूर्वीच्या सातव्या हस्तलिखितात सोडल्या आहेत. ड्युराईड अल् सिमा जो कैरोच्या म्युझियम डिपार्टमेंटचा डायरेक्टर आहे आणि त्याची इंग्लिश-इजिप्शियन माता-पिता असलेली पत्नी डॉ. रॉयन अल् सिमा यांनीच पहिल्यांदा राणी लॉस्ट्रिसच्या कबरीचा शोध लावला. रॉयन पुराणवस्तू संशोधनातील डॉक्टरेट ही पदवी घेऊन ज्या म्युझियममध्ये ड्युराईड होता तिथे 'डिपार्टमेंट अॉफ अॅन्टिक्विटिज' मध्ये नोकरी करत असते. त्यावेळी योगायोगानेच अत्यंत हुशार आणि कावेबाज इजिप्शियन ताईताने (राणी लॉस्ट्रिसचा प्रिय गुलाम) फेरो मॅमोस आणि त्याचा अफाट खजिना एका कबरीमध्ये पुरून ठेवल्याचे वर्णन चित्रलिपीमध्ये असलेल्या पेपायरसच्या गुंडाळ्या त्यांना मिळतात. 
     
 ड्युराईड आणि रॉयन हे सहा हस्तलिखितांचा अर्थ लावण्यात यशस्वी झाले होते पण सातव्या हस्तलिखिताचा बराचसा भाग हा गूढ सांकेतिक भाषेत होता. त्यांनी चित्रलिपीतल्या असंख्य हस्तलिखितांचा अर्थ लावला होता पण यात मात्र कपटी ताईताने गूढ रहस्यमय रचना केली होती. त्याचवेळी अज्ञात लोकांकडून ड्युराईडचा खून होतो आणि रॉयनच्याही खुनाचा प्रयत्न केला जातो. एकदा नव्हे दोनवेळा तिला मारण्याचा अयशस्वी प्रयत्न होतो पण तिचे नशीब बलवत्तर असल्यामुळे किरकोळ दुखापत होऊन ती त्या हल्ल्यातून बचावते. त्यानंतर ती तो देश सोडून तिच्या आईकडे इंग्लंडला जाते. पण मृत्यू तिचा पाठलाग काही सोडत नाही. तरीही रॉयन तिच्या ध्येयापासून हटत नाही. ती आणि ड्युराईड करत असलेल्या शोधाचे सर्व मायक्रोफिल्म्स्, टिपण्या चोरीला गेले असले तरी रॉयनची स्मरणशक्ती खुप तीक्ष्ण होती.  

         एवढ्या मोठ्या शोधाला पैसा कुठून आणायचा हा मोठा प्रश्न तिच्या समोर असतो त्यासाठी ती काही तडजोडी करते.   या शोधासाठी ड्युराईडने निवडलेल्या काही लोकांपैकी एक निकोलस क्वेंन्टन हार्फर ज्याचा प्राचीन इजिप्शियन वस्तूंचा संग्रह असतो त्याचे सहकार्य घेण्याचे रॉयन ठरवते. हा त्यांचा शोध नाईल उगमापासुन इथिओपियाच्या दर्‍याखोऱ्यांत पोहोचतो. त्याचवेळी तो खजिना फक्त स्वतःसाठी मिळवण्याच्या लालसेने पछाडलेले ताकदवान लोक फेरोच्या गुप्त खजिन्याच्या मागे लागल्यावर अत्यंत हिंसक असा पाठलाग सुरू होतो. पण खरंच वास्तवात असा कोणता खजिना असतो का..? की हा फक्त एक छळ असतो जो ताईताने जाणीवपुर्वक केलेला असेल. जिवाची बाजी लावणार्‍या संशोधकांच्या शोधाची ही अफलातून शोधयात्रा आहे..!

हे पुस्तक आपल्याला खाली दिलेल्या लिंक वर जाऊन खरेदी करता येईल.

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng