विश्वस्त - महाभारतकालीन रहस्याची थरारक शोधयात्रा

           
            लेखक वसंत वसंत लिमये यांची 'विश्वस्त' ही कादंबरी राजहंस प्रकाशनच्या माध्यमातून मराठीमधील पुराणकाळाचे एक रहस्य उलगडणारी अकल्पनीय रचना आहे. जानेवारी २०१७ मध्ये या कादंबरीचे प्रकाशन झाले आणि अल्पावधीतच ह्या पुस्तकाला मराठी वाचकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. निलेश जाधव यांनी कादंबरीच्या मुखपृष्ठामध्ये एक गुढ निर्माण केले आहे. आतील रेखाचित्रे सुद्धा हुबेहूब शब्दांच्या सोबत मनाच्या पटलावर एक दृश्य निर्माण करतात. तसेच मराठीमध्ये पहिल्यांदाच प्रकाशनासाठी पुस्तकाच्या ट्रेलरचा (Book Trailer - YouTube Video) यशस्वी उपयोग करुन सर्व लेखक-प्रकाशक वर्गांना आपल्या वाचकापर्यंत पोहोचण्यासाठी एक वेगळा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे.

Wishwasta - Vasan limaye

             मुंबई-पुण्यासारख्या आणि लहान-मोठ्या शहरांमधील तरुणाई भटकंतीसाठी खुप ईच्छुक असते. हा एक छंद तर असतोच मग याला जोडुन दुसरे छंदसुद्धा जोपासू लागले जाऊ लागतात. काहींना गड-किल्ले आवडतात. मग त्यात कोणी नुसता उनाड भटका असतो तर काहीजण रॅपलिंग, क्लायंबिग अश्या साहसी प्रकारांकडे आकर्षिले जातात तर, काही इतिहास संशोधनात मन रमवतात. मग अश्या नवनवीन मित्रांमधून त्यांच्या आवडत्या छंदासाठी एखादा ग्रुप तयार होतो. अश्याच एका छंदासाठी म्हणजे भटकंतीची आवड असणारा एक पाच जणांचा ग्रुप तयार होतो आणि त्यांचा विषय असतो इतिहासातील गुढ रहस्यांचा शोध घेणे.

            मकरंद, अनिरुद्ध, प्रसाद, शब्बीर आणि ज्योअॅन यांचा पुण्यातील एक ग्रुप आहे ज्याचं नाव जेएफके असे आहे. भटकंती आणि इतिहास संशोधन हा जेएफकेचा मूळ उद्देश. मकरंदला ट्रेकिंगचा अफलातुन अनुभव आणि त्याला जुन्या नाण्यांचा संग्रह यांचा सुद्धा एक छंद असायचा. तर ज्योअॅन ही एक स्कॉटिश मुलगी आहे जी आपले पीएचडी करण्यासाठी भारतात आलेली आहे आणि तिला भारताच्या पश्चिम सागरी बंदराच्या इतिहासात रस आहे. सुरुची कॉपीशॉप म्हणजे त्यांचा भेटण्याचा अड्डा. तिथे जमून यांचा हा सगळा उपद्व्याप सुरु असायचा. आतापर्यंत झालेल्या भटकंती मधून त्यांनी काही लहान-मोठी इतिहास रहस्ये उलगडण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता. ऑपरेशन विजय-दुर्ग सारख्या रहस्याचा उलगडा केल्यानंतर सरकारी यंत्रणेमागून त्यांची झालेली फसवणूक त्यांच्या खूप जिव्हारी लागल्यामुळे त्यांनी थोडा हवापालट करण्यासाठी एका ट्रेकची योजना केली अर्थातच त्यांची पहिली पसंती ही गडकिल्ल्यांची असल्यामुळे नाशिक मधील ब्रम्हगिरीलगत असलेल्या दुर्गभांडारवर नाइट कॅम्प करण्याची त्यांनी तयारी केली. मात्र थोडासा विरंगुळा म्हणुन फिरस्ती साठी गेलेल्या जेएफके ग्रुपला तिथे एक जीर्ण ताम्रपट हाती लागला आणि सुरू झाला त्यांच्या आयुष्याला एक कलाटणी देणारा शोध….!

           असे काय होतं त्या ताम्रपटात ज्यानं एका थरार नाट्याची सुरुवात झाली होती..? काय होतं त्या रहस्यात ज्यानं आजच्या दुनियेची समीकरणं बदलणार होती..? एका अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनीचं कोणते हितसंबंध त्यात गुंतले होते..? असं काय दडलं होतं ज्याचा आपल्या भारतीय राजकारणावर खोलवर परिणाम होणार होता..? महाभारताच्या उत्तर काळात असं काय घडलं होतं ज्याचा परिणाम येणारा हजारो वर्षापर्यंत निसर्गाच्या ऋतुचक्रामध्ये बांधुन ठेवला होता..? ज्याचा अर्थ चाणक्य यांना कळला. कदाचित चाणक्य-चंद्रगुप्त मौर्य यांची विश्वस्त म्हणुन झाली का..? आणि का लुटारू म्हणुन आलेला गझनीचा मेहमूदला त्या रहस्याचा शोध लावु शकला नाही. या सर्व गोष्टींचा रहस्यभेद करण्यासाठी ही कादंबरी अवश्य वाचावी.


हे पुस्तक आपल्याला खाली दिलेल्या संकेतस्थळांवरुन खरेदी करता येईल.






    संबधित युट्यूब व्हिडिओ आपण ईथे पाहू शकता.



    ConversionConversion EmoticonEmoticon

    :)
    :(
    =(
    ^_^
    :D
    =D
    =)D
    |o|
    @@,
    ;)
    :-bd
    :-d
    :p
    :ng